बांधकाम व्यवसायिकाने वेळेवर घर न दिल्यास त्याला ग्राहकाला व्याजासह संपूर्ण रक्कम द्यावी लागणार ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

यासह संबंधित बांधकाम व्यवसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याला कारागृहातही टाकले पाहिजे, असे जनतेला वाटते !

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – बांधकाम व्यवसायिकाने वेळेवर घर न दिल्यास त्याला ग्राहकाला व्याजासह संपूर्ण रक्कम द्यावी लागेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुग्राममधील एका गृहप्रकल्पाविषयी चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी दिला.

न्यायालयाने सांगितले की, घर खरेदी करणारा ग्राहक हा एकतर्फी नियम आणि अटी मान्य करण्यासाठी बांधिल नसेल. ‘अपार्टमेंट बायर्स अ‍ॅग्रीमेंट’च्या अटी  या ‘ग्राहक संरक्षण कायद्यां’तर्गत एकतर्फी आणि अयोग्य आहेत. जर बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाला प्रकल्प वेळेत पूर्ण करून दिला नाही, तर त्याला ग्राहकाला पूर्ण पैसे परत द्यावे लागतील. एवढेच नव्हे, तर त्याला ९ टक्के व्याजही द्यावे लागेल.