गूगल, फेसबूक यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांवर ‘वैश्‍विक कर’ लागू होणार

 ‘जी ७’ समूहातील देशांच्या परिषेदत एकमत

लंडन – गूगल, फेसबूक, अ‍ॅपल यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांवर ‘वैश्‍विक कर’ लागू करण्यावर ‘जी ७ (कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान) समूहातील देशांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमत झाले. ११ ते १३ जून या कालावधीत आणखी एक बैठक होणार असून त्यामध्ये याविषयीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे.

जागतिक करप्रणालीत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनकने यांनी दिली. या बहुराष्ट्रीय आस्थापनांना ‘स्वतःच्या आस्थापनामुळे पर्यावरणाची कोणती हानी झाली ?’, हेही आता सांगावे लागणार आहे.