केरळमधील माकप आघाडी सरकारने लसीकरणाच्या प्राधान्य सूचीमध्ये हज यात्रेकरूंचाही केला समावेश !

कोरोनापासून सर्वांचेच रक्षण करणे अपेक्षित आहे; मात्र त्यात प्राधान्य देतांना सरकारने हिंदु यात्रेकरूंना अशाप्रकारे प्राधान्य दिले असते का ? असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो !

प्रतिकात्मक छायाचित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यातील माकप आघाडी सरकारने कोरोना लसीकरणासाठी १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील नागरिकांना प्राधान्य दिले आहे. त्यातीलही ४३ गटांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्यात हज यात्रेकरूंचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच आदिवासी पाड्यातील तरुण, कोरोनाशी लढण्याच्या आघाडीवर काम करणारे, पोलीस प्रशिक्षक, उच्च आणि कनिष्ठ न्यायालयातील कर्मचारी, यांसह हवामान खाते, मेट्रो, एअर इंडिया इत्यादी विभागातील कर्मचारी यांचाही समावेश आहे.