चीनमध्ये बेरोजगार तरुणाने संतापाच्या भरात चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात ६ जणांचा मृत्यू, तर १४ जण घायाळ

बीजिंग (चीन) – चीनमधील अनहुई प्रांतातील आनछिंग शहरामध्ये एका २५ वर्षीय बेरोजगार तरुणाने संतापाच्या भरात काही लोकांवर चाकूद्वारे आक्रमण केले. यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण घायाळ झाले. पोलिसांनी लियू नावाच्या या तरुणाला अटक केली आहे. गेल्या आठवड्याभरात चीनमध्ये अशा प्रकारच्या २ घटना घडल्या आहेत.