इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात चालू करण्यात येणार्‍या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमाला अंनिसकडून विरोध !

हिंदु धर्मातील शास्त्रांना विरोध करण्यासाठी पुढे असलेल्या अंनिसने कधी अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकांमध्ये भूत, पिशाच्च आदींच्या उल्लेखाविषयी कधी तरी आक्षेप घेतला आहे का?

पेट्रोल पंपावर पावणे ९ लाखांची चोरी करणार्‍या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई !

सय्यदनगर परिसरातील पेट्रोल पंपावरील रोकड बँकेत भरण्यासाठी नेतांना लूटमार करणार्‍या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली.

इगतपुरी (नाशिक) येथील ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४ अभिनेत्रींसह २२ जणांना अटक !

त्याग शिकवणारी भारतीय संस्कृती कुठे आणि भोगविलासात बुडवणारी पाश्चात्त्य विकृती कुठे ? हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांवर पुरोगामी मंडळी नेहमी टीका करतात; मात्र पाश्चात्त्य कुप्रथांच्या या व्यभिचारी अंधानुकरणाविषयी तोंडातून ‘ब्र’ही काढत नाहीत.

पोर्तुगिजांच्या सालाझारशाहीची साक्ष असलेले सत्तरी तालुक्यातील ‘कादय’च्या (कारागृहाच्या) जतनासंदर्भात सरकारची अनास्था !

‘कादय’ (कारागृह) म्हणजे पोर्तुगिजांच्या सालाझारशाहीची (सालाझार नावाच्या क्रूरतेने वागणार्‍या राज्यकर्त्याची हुकूमशाही) साक्ष आहे. भावी पिढीसाठी त्यांचे जतन होणे आवश्यक आहे

वराड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील थोर संत प.पू. परूळेकर महाराज यांचा देहत्याग !

प.पू. परूळेकर महाराज गेले काही मास आजारी होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला दुपारी २.१५ वाजता ‘श्रीरामनगरी’ आश्रमातील श्रीराम मंदिर आणि श्री दत्त मंदिर या मंदिरांच्या मधल्या परिसरात समाधीस्त करण्यात आले.

पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी वारकरी ३ जुलैला आळंदी येथून प्रस्थान करणार ! – संतवीर बंडातात्या कराडकर

यंदाही वारकरी संप्रदायाशी चर्चेचे नाटक करून पादुका सोहळा पायी जाऊ नये, असा एकतर्फी निर्णय घोषित केला. वारकरी संप्रदायाच्या किमान १०० लोकांसमवेत हा सोहळा होण्याच्या भावनेचा चुराडा केला आहे.

अस्मानी जिहादी !

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांचा नायनाट केला जात आहे, असे सांगितले जाते. प्रतिवर्षी २०० आतंकवादी ठार केले जात आहेत. काही आतंकवाद्यांना अटकही करण्यात आली आहे.

ट्विटरवर बंदी केव्हा घालणार ?

ट्विटरच्या ‘ट्वीप लाईफ’ या ‘करियर’संबंधी भागामध्ये दाखवण्यात आलेल्या जगाच्या मानचित्रामधील भारताच्या मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग दाखवलेला नाही.

समाजातील प्रत्येक घटनेकडे वार्ता म्हणून पाहून ती जनप्रबोधनाच्या दृष्टीने सिद्ध केल्यास आपली समष्टी साधना चांगली होईल ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरावर ‘ऑनलाईन वार्ताहर प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन