दाखल्याअभावी शाळांना विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारता येणार नाही !

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा आदेश

संभाजीनगर – इयत्ता नववी किंवा दहावी या वर्गांत अन्य शाळांतून विद्यार्थी प्रवेशाची मागणी करत असल्यास अशा विद्यार्थ्यांना दाखल्याअभावी (टीसी) प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असा शासन निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी लागू केला आहे. राज्यातील शासकीय, महापालिका, नगरपालिका किंवा खासगी अनुदानित माध्यमिक शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे.

या निर्णयात म्हटले आहे की, दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश देण्यात यावा. प्रवेशापासून विद्यार्थी वंचित रहाणार नाही, तसेच शिक्षण खंडित होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित शाळा आणि मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.