नागपूर येथे ११ वर्षांपासून अवैधरित्या लपून रहाणार्‍या अफगाणी धर्मांधाला अटक !

  • सामाजिक माध्यमांतून धर्मांध तालिबानी आतंकवाद्यांच्या संपर्कात !

  • अकार्यक्षम पोलीस यंत्रणा !

नूर मोहम्मद

नागपूर – ‘शहरातील दिघोरी भागात छुप्या पद्धतीने गेल्या ११ वर्षांपासून अवैधरित्या रहाणार्‍या अफगाणी नागरिकाला पोलिसांनी १७ जून या दिवशी अटक केली आहे. नूर मोहम्मद (वय ३० वर्षे) असे त्याचे नाव असून तो तालिबानी समर्थक आहे. तो सामाजिक माध्यमांतून तालिबानी आतंकवाद्यांना संपर्क करत होता, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

तो वर्ष २०१० पासून शहरात अवैधरित्या रहात होता. पोलिसांनी त्याच्याकडील कागदपत्रे पडताळली आहेत. त्याच्या अंग झडतीच्या वेळी त्याच्या शरिरावर बंदुकीच्या गोळीची खूणही आढळून आली आहे. त्याचे आणखी काही साथीदार आहेत का ? तो तालिबानी आतंकवाद्यांना का संपर्क करत होता ? त्याचा त्यांच्याशी काय संबंध आहे ? याचा पोलीस शोध घेत आहेत. नूर याला परत अफगाणिस्तानला पाठवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

गेल्या ११ वर्षांपासून शहरात छुप्या पद्धतीने अफगाणी नागरिक रहात असतांना पोलिसांच्या गुप्त शाखेला याचा सुगावा कसा लागला नाही ? यावरून पोलिसांची ढिसाळ व्यवस्था दिसून येते. तो रहात असलेल्या संबंधित पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील पोलीस अधिकार्‍यांना या प्रकरणी उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. एका अफगाणी नागरिकाला इतकी वर्षे पकडू न शकणारे पोलीस गल्लीबोळात लपलेल्या आतंकवाद्यांना कसे पकडणार ?