मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासाबाहेर स्फोटके सापडल्याचे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येचे प्रकरण

  • २८ जूनपर्यंत एन्.आय्.ए.ची कोठडी

(डावीकडे) प्रदीप शर्मा

मुंबई – मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केली असून त्यांना २८ जूनपर्यंत एन्.आय्.ए.ची कोठडी देण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १७ जून या दिवशी सकाळी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरावर धाड टाकली. त्यानंतर दुपारी त्यांना अटक करण्यात आली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाच्या बाहेर एका चारचाकी वाहनात सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यानंतर स्फोटके असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या, या प्रकरणांमध्ये एप्रिल मासात प्रदीश शर्मा यांचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण करण्यात आले होते. यापूर्वी अटकेतील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनाही या वेळी त्या ठिकाणी आणण्यात आले होते.