आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी भाजपचा विरोध करण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा दिला होता प्रस्ताव !

  • श्रीराममंदिरासाठी भूमी खरेदीचे प्रकरण

  • अयोध्येतील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांचा दावा !

पोलिसांनी या दाव्याचा शोध घेऊन जर तो खरा असेल, तर या तिन्ही पक्षांवर लाच देण्याचा प्रयत्न केल्यावरून कारवाई केली पाहिजे !

महंत परमहंस दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरासाठी २० कोटी रुपयांच्या भूमी खरेदीच्या प्रकरणावरून भाजप आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांचा विरोध करण्यासाठी आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्याकडून १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव आला होता, असा दावा येथील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी केला आहे. २० कोटी रुपयांच्या भूमी खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आप, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्याकडून केला जात आहे.

महंत परमहंस दास यांनी म्हटले की, एका सकाळी दोन व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि त्यांनी १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवला. मी त्याला नकार दिल्यावर त्यांनी म्हटले, ‘जर राज्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांचा विजय होऊन त्यांची सत्ता आली, तर तुम्हाला मुख्यमंत्री बनवले जाईल.’ यावर मी त्यांना म्हटले की, मी एक संत आहे आणि माझ्यासाठी राष्ट्रहित हेच सर्वस्व आहे.