हिंदूंना देशात सन्मानाने रहाता यावे, यासाठी घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावरील राष्ट्रप्रेमी नागरिक अन् जिज्ञासू यांच्यासाठी नुकतेच ‘ऑनलाईन’ व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

अंगावर गणवेश आणि ‘बॅण्ड’ नसतांना अधिवक्ता न्यायालयाच्या सुनावणीसाठी उपस्थित कसा राहू शकतो ? – उच्च न्यायालय

नागपूर येथे गणवेशात न येणार्‍या अधिवक्त्याला उच्च न्यायालयाची चपराक !

नाशिक येथे ट्रकच्या धडकेत ९ गायींचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रकचालकास अटक

शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथे रस्ता ओलांडणार्‍या गायींच्या कळपाला नाशिकच्या दिशेने येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ९ गायी जागीच ठार झाल्या, तर ५ गायी घायाळ झाल्या आहेत.

लोणावळ्यात कोरोनाचे नियम डावलून पर्यटकांची गर्दी !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकाही राज्यकर्त्याने जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !

नागपूर येथील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत करा ! – भाजप शिक्षक आघाडीची मागणी

‘शालेय शिक्षण विभागाने इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा रहित केली; मात्र दहावीच्या अंदाजे १६ लाख आणि बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांनी १४० कोटी रुपयांच्या घरात परीक्षा शुल्क शिक्षण विभागाकडे जमा केले होते.

चंद्रपूर येथे गतीरोधकांमुळे रुग्णालयात नेता न आल्याने उपचारांअभावी सर्पदंश झालेल्या मुलाचा मृत्यू !

जिल्ह्यातील मुधोली या गावातील चेतन जीवतोडे (वय १६ वर्षे) याला विषारी नागाने चावा घेतला; मात्र ताडोबातील बफर क्षेत्रात लावलेल्या गतिरोधकांमुळे त्याला वेळेवर रुग्णालयात नेता आले नाही. त्यामुळे चेतन याचा मृत्यू झाला, असा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

दूध दरासाठी राज्यातील सर्व तहसिलदार कार्यालयांवर मोर्चे काढण्याचा दूध उत्पादकांचा निर्णय !

दळणवळण बंदीचा अपलाभ घेत खासगी आणि सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रतिलिटर अल्प केले, मात्र ग्राहकांना आहे त्याच दराने विक्री करत ग्राहकांची प्रचंड आर्थिक लूटमार केली.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून मुंबईतील आणखी २ जणांना अटक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सापडलेल्या ‘जिलेटिन’ कांड्यांच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मालाड येथून आणखी २ जणांना अटक केली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवत पर्यटकांची सिंहगडावर गर्दी !

‘सिंहगड पर्यटकांसाठी अजूनही बंद असल्याने नियम मोडून कुणीही गडावर गर्दी करू नये. अन्यथा गुन्हे नोंदवले जातील. तसेच सरकारचे आदेश पाळून सहकार्य करावे’, असे आवाहन वनविभाग आणि पोलीस प्रशासन यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर येथे मूक आंदोलन !

छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी १६ जून या दिवशी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीजवळ मूक आंदोलन करण्यात येणार आहे.