स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकाही राज्यकर्त्याने जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !
पुणे – कोरोना महामारीमुळे सिंहगडावर जाण्यास अनुमती नसतांनाही कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवत पर्यटकांनी सिंहगडावर गर्दी केली. नागरिक सिंहगडावर विना‘मास्क’ आणि सामाजिक अंतर न राखता फिरत होते. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी गडावर जाण्यास बंदी असल्याचे सांगत असतांनाही गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. (यावरून पोलीस प्रशासनाचा जनतेला धाक नाही, हेच लक्षात येते. असे पोलीस प्रशासन जनतेला शिस्त कशी लावणार ? – संपादक)
‘सिंहगड पर्यटकांसाठी अजूनही बंद असल्याने नियम मोडून कुणीही गडावर गर्दी करू नये. अन्यथा गुन्हे नोंदवले जातील. तसेच सरकारचे आदेश पाळून सहकार्य करावे’, असे आवाहन वनविभाग आणि पोलीस प्रशासन यांनी केले आहे.