लोणावळ्यात कोरोनाचे नियम डावलून पर्यटकांची गर्दी !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकाही राज्यकर्त्याने जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !

लोणावळा – कोरोना संसर्गाचा धोका कायम असतांना मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडत आहे. लोणावळा-खंडाळा येथे पर्यटकांची गर्दी होत आहेत. या वेळी ‘मास्क’ घालणे आणि सामाजिक अंतर राखणे या नियमांचेही पालन होतांना दिसत नाही. (नागरिकांनी कोरोनाच्या संकटाचे भान ठेवून आणि स्वतःचे दायित्व ओळखून वागायला हवे ! तसेच नियम मोडणार्‍यांवर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक) ‘कोरोनाचा संसर्ग टाळून सुरक्षित पर्यटन होण्यासाठी पर्यटकांनी ‘मास्क’चा वापर करावा’, असे आवाहन लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे.