उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासाबाहेर ‘जिलेटिन’च्या कांड्या सापडल्याचे प्रकरण
मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सापडलेल्या ‘जिलेटिन’ कांड्यांच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मालाड येथून आणखी २ जणांना अटक केली आहे.
Antilia bomb scare case: NIA arrests two people, sent to custody till June 21 https://t.co/6tfIXiy40Y
— TOI Mumbai (@TOIMumbai) June 15, 2021
संतोष शेलार आणि आनंद जाधव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयात उपस्थित केले असता २१ जूनपर्यंत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३ पोलीस अधिकारी आणि १ हवालदार यांना निलंबित करण्यात आले आहे.