कुर्डी (सांगे) येथे कबरीच्या भोवती नव्याने केलेल्या बांधकामावरून सामाजिक माध्यमांत चर्चेला उधाण !

भाजपचे सरचिटणीस अधिवक्ता नरेंद्र सावईकर यांनी कुर्डीच्या घटनेची तुलना आसाम-बांगलादेश सीमेशी केली !

अशा प्रकारे प्रार्थनास्थळांचा हळूहळू विस्तार करून नंतर ते अधिकृत असल्याचे भासवत प्रशासनाला वाकवणे, ही पद्धत धर्मांधांकडून सर्वत्र वापरली गेली आहे, हे जाणून प्रशासनाने वेळीच सावध व्हावे !

प्रातिनिधिक चित्र

पणजी, १२ जून (वार्ता.) – साळावली धरणामुळे पाण्याखाली गेलेल्या कुर्डी गावातील कबरीचे बांधकाम नव्याने केल्याची चर्चा सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांत दिसून येत आहे. या ठिकाणी चादर चढवलेली कबर कुणाची, हे गावातील लोकांना ठाऊक नाही. यंदा या ठिकाणी ‘सय्यद सलाउद्दीन शहा काद्री’, असा फलकही लावण्यात आला आहे. कबरीच्या बाजूला दगडी चौथराही उभारण्यात आला आहे. नव्याने सिंमेटचे बांधकाम करण्यात आले आहे. याविषयी भाजपचे सरचिटणीस अधिवक्ता नरेंद्र सावईकर यांनी कुर्डीच्या घटनेची तुलना आसाम आणि बांगलादेश सीमेशी केली आहे.

अधिवक्ता नरेंद्र सावईकर यांनी ट्वीटमध्ये म्हणतात, ‘‘सांगे तालुक्यात कुर्डी गावात अचानक एक अनधिकृत बांधकाम उभारले असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आहे. यामुळे सांगेवासियांसमवेत गोमंतकीय जनताही अस्वस्थ झालेली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरकारही सतर्क झाले आहे. या वेळी मला मुंबईस्थित कवी शरदमणी मराठे यांच्या एका कवितेची आठवण होते. वर्ष १९८२ मध्ये आसाम आणि बांगलादेश सीमेला भेट दिल्यानंतर त्यांनी लिहिलेले हे वाक्य आहे. ते म्हणतात, ‘‘आज काळ बदलला आणि देशहित सर्वतोपरी मानणारे राज्यकर्ते आले; परंतु आव्हाने मात्र अजूनही आहेत.’’

जलसंपदा खात्याच्या दुर्लक्षामुळे कुर्डी येथे अनधिकृत बांधकामे ! – पंचसदस्य

भाटी ग्रामपंचायतीचे पंचसदस्य मनोज पर्येकर म्हणाले, ‘‘आंगडी, कुर्डी गावात पूर्वीपासून मुसलमान समाजाची अवघी काही घरे होती; पण धार्मिक उत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी दर्गा, मशीद आदी प्रकार नव्हता. केवळ मृत झालेल्यांच्या कबरी होत्या; मात्र आता जलसंपदा खात्याच्या दुर्लक्षामुळे कुर्डी येथे अनधिकृत बांधकामे होऊ लागली आहेत. अजूनही कुर्डी गावात काही घरांचे अवशेष दिसून येतात. धरणाची पातळी खाली आल्यावर घरांसमोरील तुळशी वृंदावन, मंदिरांचे गर्भगृह, देवतांच्या मूर्ती, लिंग, क्रॉस आदी दिसून येतात. स्थानिक लोक ते पहायला जात असतात.’’