पिरंगुट येथील आग दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांचा मागण्या मान्य न झाल्यास मृतदेह घेण्यास नकार !

पिरंगुट येथील आग दुर्घटना

पिरंगुट – येथील एस्.व्ही.एस्. टेक्नॉलॉजी या आस्थापनाला लागलेल्या आगीत मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी ४ मागण्या केल्या असून त्या पूर्ण न झाल्यास मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. नातेवाईकांनी केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.

१. मृत व्यक्तीच्या वारसांना २५ लाख रुपये द्यावेत.

२. मुलांच्या शिक्षणाचे आजीवन दायित्व स्वीकारावे.

३. प्रत्येक मृत व्यक्तीच्या घरातील एका व्यक्तीस कायमस्वरूपी नोकरी द्यावी.

४. नियमांचे उल्लंघन करून आस्थापनाला परवानगी देणार्‍या अधिकार्‍यांना या प्रकरणात सहआरोपी करावे.

मृतांचे नातेवाईक या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनाही भेटणार आहेत, तसेच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नातेवाइक आणि संघटना आमरण उपोषणाला बसणार, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.