ठाणे येथे १५ जणांनी अवैधरित्या लस घेतली !

अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे बनावट ओळखपत्र सिद्ध करून तिला अवैधरित्या लस दिल्याचे उघड झाले होते. समितीच्या अन्वेषणातून अशा प्रकारे २१ श्रीमंत तरुण-तरुणींची बनावट ओळखपत्र सिद्ध केली होती. यापैकी १५ जणांनी ‘फ्रँटलाईन’ कामगार म्हणून अशा प्रकारे लस घेतल्याची समोर आले.

भायखळा येथे पोलीस हवालदाराने ५० लाख रुपयांचे दागिने चोरले !

भायखळा येथे खलील शेख या पोलीस हवालदाराने कट रचून सोन्याच्या व्यापार्‍याचे ५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. या हवालदारासह चोरीत सहभागी असणार्‍या त्याच्या सहकार्‍यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

बदलापूर येथील रासायनिक आस्थापनात वायू गळती, तर भिवंडीत भंगारची १५ गोदामे जळून खाक !

बदलापूर परिसरातील लोकांना श्‍वास घेणे, डोळे जळजळणे असे त्रास होऊ लागले, तर भिवंडी येथे वित्तहानी झाली आहे.

पालघर तालुक्यात कोरोनाविषयी जनजागृती करणार्‍या पथकावर गावगुंडांचे आक्रमण !

पालघर तालुक्यातील गांजेढेकाळे आणि जायशेत ग्रामपंचायतीच्या हद्दीतून पालघर जिल्हा परिषदेचा कोरोनाविषयीची जनजागृती करणारा चित्ररथ जात होता. तेथील मद्याच्या नशेत धुंद असलेल्या १० ते १२ गावगुंडांनी रथ थांबवला आणि आक्रमणही केले

साखर कारखान्यांचा स्वार्थीपणा !

सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांना शेतकर्‍यांची उसाची देयके द्यावीशी वाटत नाही, हे स्वार्थीपणाची परिसीमा ओलांडून संवेदनशीलतेचा र्‍हास झाल्याचे लक्षण आहे.

संपूर्ण देशातच असे उपचार व्हावेत !

नवी देहली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान या रुग्णालयामध्ये करण्यात आलेल्या आयुर्वेदाच्या उपचारांमुळे आतापर्यंत कोरोनाचे ६०० रुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे एकूण रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही.

खलिस्तानी आतंकवाद : चीनचे छुपे युद्ध !

खलिस्तानी आतंकवादाच्या माध्यमातून चीन आणि पाकिस्तान यांना भारतात अस्थिरता निर्माण करायची आहे.

अशी काँग्रेस इतर क्षेत्रांतही किती हानी करत असेल ! 

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजस्थानमध्ये कोरोना लसींचे ११ लाख ५० सहस्र डोस वाया गेल्याचा दावा केला आहे.

अकार्यक्षम पोलीस !

आमच्या घराच्या शेजारील दारुडे येऊन आम्हाला पुष्कळ त्रास द्यायचे. आमच्या साहाय्याला कुणी नातेवाईक किंवा पोलीसही येत नसत