ठाणे, ४ जून (वार्ता.) – बदलापूर औद्योगिक वसाहतीतील नोबेल इंटरमिडीएट्स नावाच्या रासायनिक आस्थापनातील रिक्टरमध्ये ३ जूनला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वायू गळती झाली. यामुळे परिसरातील लोकांना श्वास घेणे, डोळे जळजळणे असे त्रास होऊ लागले. अग्नीशमन दलाच्या सैनिकांनी ही गळती थांबवली. या घटनेत कुणालाही दुखातप झालेली नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. भिवंडी येथे भंगाराच्या गोदामात लागलेल्या भीषण आगीत १५ गोदामे भस्मसात झाली. तेथे वित्तहानी झाली आहे.