ट्विटरकडून भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खात्यावरील हटवलेली ‘ब्लू टिक’ पुन्हा बहाल !

ज्या प्रमाणे विरोधानंतर ट्विटरकडून ‘ब्लू टिक’ बहाल केली जाते, तसेच हिंदूंच्या संघटनांची फेसबूक पाने बंद करणार्‍या फेसबूकच्या विरोधातही हिंदूंनी आवाज उठवून त्यांच्यावर दबाव निर्माण करून ती पाने पुन्हा चालू करण्यास फेसबूकला बाध्य केले पाहिजे !

अल् कायदाचे कट्टर आतंकवादी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लपले आहेत ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांच्या आतंकवादविरोधी यंत्रणेच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, अल् कायदाचे बहुतेक कट्टर आतंकवादी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील भागात लपले आहेत.

फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूकचा हिंदुद्वेष पहाता उद्या त्याने सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांची पाने बंद केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! हिंदु जनजागृती समिती आज जात्यात आणि अन्य सुपात असल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन फेसबूकचा वैध मार्गाने प्रखर विरोध केला पाहिजे !

संभाजीनगर येथे कोरोनाच्या संकटकाळात उद्योग संघटनांनी केलेल्या कार्याची केंद्रशासनाच्या नीती आयोगाकडून नोंद !

कोरोना साथरोगाची दाहकता लक्षात घेऊन शहरातील उद्योजकांच्या संघटनांनी ‘टीम ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन’ असा एक समूह सिद्ध करून वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ केली.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशभरात मागणी वाढलेले ‘रेमडेसिविर इंजेक्शन’ सोलापूरात ११ सहस्र ८०० इतके शेष

एप्रिलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने ‘रेमडेसिविर इंजेक्शन’ची देशभरात मागणी वाढली होती; मात्र आस्थापनांकडून पुरेसा पुरवठा न झाल्याने जिल्हा प्रशासनाने वितरण व्यवस्थेवर नियंत्रण मिळवले होते.

मराठीला आयटीचा पर्याय नको ! – शिक्षक महासंघाची मागणी

महाराष्ट्रात मराठी भाषेला आयटीचा पर्याय देणे संतापजनक ! सरकारने महाविद्यालयांत मराठी विषय अनिवार्य करावा !

खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांची लूट न थांबवल्यास कारवाई ! – येडियुरप्पा, मुख्यमंत्री, कर्नाटक

कोरोना रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

५०० कोटी रुपयांच्या दुसर्‍या ‘पॅकेज’ची रक्कम सेवा सिंधू आणि इतर माध्यमातून संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा होणार ! – येडियुरप्पा, मुख्यमंत्री, कर्नाटक

दळणवळण बंदीच्या काळात संकटात सापडलेल्या विविध घटकांसाठी ५०० कोटी रुपयांचे दुसरे आर्थिक पॅकेज घोषित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पुणे-सातारा प्रवासातील खंबाटकी घाट रस्ता होणार इतिहास जमा !

पुणे-सातारा असा प्रवास करण्यासाठी खंबाटकी बोगद्यातून जावे लागणार असल्याने सध्याचा खंबाटकी घाट रस्ता इतिहास जमा होणार आहे.

सरकारने वारकर्‍यांच्या भावना लक्षात घेऊन ‘आषाढी पायी वारी’च्या संदर्भात तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा ! – हिंदु जनजागृती समिती

आम्ही बंधने पाळू; मात्र पायी वारी बंद होऊ देणार नाही ! – ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, वारकरी महामंडळ सचिव (आळंदी)