सोलापूर – कोरोनाच्या दुसर्या लाटेत एप्रिलमध्ये ‘ऑक्सिजन’ आणि ‘रेमडेसिविर इंजेक्शन’साठी प्रशासन आणि रुग्ण यांची धावपळ झाली; मात्र आता लाट ओसरल्याने जिल्हा प्रशासनाकडे ११ सहस्र ८०० रेमडेसिविर इंजेक्शन शेष आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने ‘रेमडेसिविर इंजेक्शन’ची देशभरात मागणी वाढली होती; मात्र आस्थापनांकडून पुरेसा पुरवठा न झाल्याने जिल्हा प्रशासनाने वितरण व्यवस्थेवर नियंत्रण मिळवले होते.
शासकीय रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन वापरण्यात येणार आहे. भविष्यातील आवश्यकता आणि सध्या येणार्या अत्यवस्थ रुग्णांसाठी या इंजेक्शनचा वापर केला जात आहे.