५०० कोटी रुपयांच्या दुसर्‍या ‘पॅकेज’ची रक्कम सेवा सिंधू आणि इतर माध्यमातून संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा होणार ! – येडियुरप्पा, मुख्यमंत्री, कर्नाटक

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा

बेळगाव – दळणवळण बंदीच्या काळात संकटात सापडलेल्या विविध घटकांसाठी ५०० कोटी रुपयांचे दुसरे आर्थिक पॅकेज घोषित करण्यात येत असून ही रक्कम सेवा सिंधू आणि इतर माध्यमातून संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. यात धर्मादाय ‘क’ श्रेणी मंदिर पुजार्‍यांसाठी ३ सहस्र रुपये, मंदिरातील स्वयंपाकी कर्मचार्‍यांसाठी ३ सहस्र रुपये, इमाम-मौलवी यांच्यासाठी ३ सहस्र रुपये, विनाअनुदानीत शिक्षकांना ५ सहस्र रुपये, मच्छिमारांसाठी ३ सहस्र रुपये, विणकरांसाठी ३ सहस्र रुपये, अंगणवाडी कर्मचारी यांच्यासाठी २ सहस्र रुपये दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्धा किलो दूध पावडर वितरित केली जाणार आहे, अशी माहिती कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिली. बेळगाव येथे विविध कामांच्या उद्घाटनप्रसंगी  पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.