बेळगाव – कोरोना रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील काळात खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांची लूट न थांबवल्यास कडक कारवाई केली जाईल, अशी चेतावणी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिली आहे. कोरोनाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.
१. कोरोना पॉझिटिव्हिटी ५ टक्क्यांवर आणण्याच्या सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. सरकार कोरोना उपचार, लसीकरण अशा सर्व उपाययोजना करत आहे.
२. प्रत्येक ग्रामपंचायतीला ५० सहस्र रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. २० सहस्र लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक आणि १ सहस्र ५०० ‘एल्.पी.एम्.’ क्षमतेचा ‘ऑक्सिजनरेटर’ उभारण्यास संमती देण्यात आली आहे.
३. शेतकर्यांना उसाचे पैसे तात्काळ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थिती सुधाल्यानंतर १२ वीची परीक्षा घेण्याविषयी विचार चालू आहे.
४. बिम्स रुग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी प्रशासक म्हणून प्रादेशिक आयुक्त अम्लान बिश्वास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.