महाराष्ट्रात मराठी भाषेला आयटीचा पर्याय देणे संतापजनक ! सरकारने महाविद्यालयांत मराठी विषय अनिवार्य करावा !
पुणे – वाढीव शुल्क आकारणी करता यावी, यासाठी राज्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भाषा विषयाला पर्याय म्हणून आयटी हा विषय ठेवला जातो. या विषयामुळे विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळू शकतात, असे आमिष दाखवून आर्थिक लाभापोटी शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना आयटी विषय घेण्यास सांगत आहेत. बारावीला मिळणाऱ्या अधिक गुणांमुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा हा विषय घेण्याकडे कल वाढत आहे; मात्र मराठी भाषेला पर्याय म्हणून हा विषय ठेवू नये, अशी आग्रही मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील दिसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.