अवैध धंद्यांवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या विशेष पथकातील पोलिसांनीच वाळू व्यावसायिकाकडे मागितली लाच !

पथकातील पोलीस लाच मागत आहेत, हे ठाऊक असूनही त्यांच्यावर त्याच वेळी कडक कारवाई न झाल्याने ते पळून जाऊ शकले. अशा दायित्वशून्य पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी !

पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून परमबीर सिंह यांचे अन्वेषण करण्यास नकार !

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अन्वेषण करण्यास नकार कळवला आहे. पांडे यांनी नकार का दिला ? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही; मात्र यातून केंद्र आणि राज्य शासन यांच्यातील अंतर्गत कुरघोड्या ….

बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांचा राजकारणातून संन्यास

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयात महत्त्वाचा वाटा असणारे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ‘राजकीय रणनीतीकार’ म्हणून निवृत्ती घेत राजकारणाला रामराम ठोकला आहे.

नागपूर येथे मनरेगाचे आयुक्तालय आगीत बेचिराख

सिव्हिल लाईन्स परिसरात प्रशासकीय इमारत क्रमांक २ मध्ये पहिल्या माळ्यावर असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या राज्य आयुक्तालयात २ मे या दिवशी सकाळी मोठी आग लागली.

लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईमध्ये ४५ वर्षे वयापुढील नागरिकांचे कोरोनावरील लसीकरण बंद !

लसीच्या मर्यादित साठ्यामुळे मुंबईमध्ये ४५ वर्षे वयापुढील नागरिकांचे कोरोनावरील लसीकरण बंद करण्यात आले आहे. लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळवण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गोरक्षकांचे संरक्षण शासन कधी करणार ?

आळेफाटा परिसरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोरक्षक तथा मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी यांच्यावर गोमाफियांकडून आक्रमणाचा प्रयत्न करण्यात आला. श्री. स्वामी यांचे वाहनचालक आणि प्रशासकीय सुरक्षारक्षक यांच्यामुळे बचावले.

फलटण (जिल्हा सातारा) येथील कसाईनगर येथील २ पशूवधगृहांवर धाड !

गोवंशियांना हत्येसाठी आणल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाच अगोदर कशी मिळते ? पोलिसांना का मिळत नाही, याचा विचार पोलीस करतील का ?

कठीण प्रसंगातही कृतज्ञताभावात रहाणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे कल्याण (ठाणे) येथील कै. माधव साठे (वय ७५ वर्षे) यांनी गाठले संतपद !

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सर्वांच्याच डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असतांना ‘साधनेमुळे मृत्यू आणि प्रतिकूल परिस्थिती यांना गुरुनिष्ठेच्या बळावर कसे तोंड द्यायला हवे ?’, हे पू. साठेकाकांच्या उदाहरणातून सर्वांना शिकण्यासारखे आहे.

पू. सौरभ जोशी यांची सेवा करतांना श्री. समृद्ध चेऊलकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात सेवा करणारे श्री. समृद्ध चेऊलकर सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्या सेवेत असतात. पू. सौरभदादा जन्मतःच विकलांग असल्याने ते स्वतःचे काहीही करू शकत नाहीत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतींवर पडलेल्या डागांमध्ये झालेले बुद्धीअगम्य पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर, तसेच लाद्यांवर पडलेल्या डागांची दिनांक ११ ते १३ मार्च २०२१ या कालावधीत छायाचित्रे काढण्यात आली. याच डागांची वर्ष २०१३ आणि वर्ष २०१८ मध्येही छायाचित्रे काढण्यात आली होती. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास करता पुढील सूत्रे लक्षात आली.