बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर प्रशांत किशोर यांचा राजकारणातून संन्यास

प्रशांत किशोर

कोलकाता – बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयात महत्त्वाचा वाटा असणारे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ‘राजकीय रणनीतीकार’ म्हणून निवृत्ती घेत राजकारणाला रामराम ठोकला आहे. ‘मला संन्यास घ्यायचाच होता, त्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होतो. बंगालच्या निमित्ताने ही संधी मिळाली, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.


प्रशांत किशोर यांनी इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटीमधून बाहेर पडत असल्याचेही स्पष्ट केले आहे. प्रशांत किशोर यांनीच याचा प्रारंभ केला होता. प्रशांत किशोर यांनी बंगालमध्ये १०० पेक्षा अल्प जागा भाजपला मिळतील, असे भाकित वर्तवले होते. जर हा आकडा भाजपने ओलांडला, तर संन्यास घेईन, असे त्यांनी म्हटले होते.

प्रशांत किशोर यांनी या वेळी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. निवडणूक आयोग भाजपचा विस्तारित भाग असल्याप्रमाणे काम करत आहे, असेही ते म्हणाले.