मुंबई – लसीच्या मर्यादित साठ्यामुळे मुंबईमध्ये ४५ वर्षे वयापुढील नागरिकांचे कोरोनावरील लसीकरण बंद करण्यात आले आहे. लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळवण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या केवळ १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मुंबई सेंट्र्रल येथील नायर रुग्णालय, घाटकोपर येथील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी रुग्णालय, जुहू येथील सर्वोपचार रुग्णालय, अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय आणि वांद्रे-कुर्ला येथील जम्बो कोविड सेंटर या ठिकाणी मर्यादित स्वरूपात करण्यात येत आहे. ‘सूचना येत नाही, तोपर्यंत ४५ वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी येऊ नये’, अशी सूचना पालिका प्रशासनाने दिली आली आहे.