कलम ३७० हटवण्यासाठी राज्यघटनेत पालट केले, ती गती मराठा आरक्षणाविषयीही दाखवावी ! – उद्धव ठाकरे

शहाबानो प्रकरण, अ‍ॅट्रॉसिटी कायदा, तसेच कलम ३७० हटवणे यांसाठी केंद्रशासनाने तत्पर निर्णय घेऊन न्यायप्रियता दाखवली. यासाठी राज्यघटनेतही पालट केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाविषयीही दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडण्याचे काम केले ! – देवेंद्र फडणवीस

राज्यांना आरक्षणाचा कायदा करण्याच्या अधिकार असल्याच्या १०२ व्या घटना दुरुस्तीविषयी उच्च न्यायालयात आम्ही जी भूमिका मांडली, ती सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात शासन पूर्णपणे अपयशी ठरले किंवा जाणीवपूर्वक ती मांडली नाही. महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडण्याचे काम केले

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या अधिकार्‍यांना कारागृहात टाकल्याने नाही, तर काम केल्याने ऑक्सिजन मिळेल !

अधिकार्‍यांना कारागृहात टाकल्याने रुग्णांना ऑक्सिजन मिळणार नाही, तर प्रत्यक्ष काम करण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देहलीला ऑक्सिजनच्या  तुटवड्यावरून फटकारले.

बेंगळुरू येथील रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी लाच घेऊन दिल्या जात आहेत खाटा ! – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा आरोप

सूर्या यांनी आरोप करतांना म्हटले की, बेंगळुरू महानगरपालिकेचे अधिकारी, बाहेरील दलाल, कोविड वॉर रूम आणि कॉल सेंटरमधील प्रमुख हा घोटाळा करत आहेत. या रुग्णालयामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसणार्‍या व्यक्तीच्या नावाने खाट आरक्षित करून ठेवली जाते

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनामुळे एस्.टी.च्या २०५ कर्मचार्‍यांचा मृत्यू

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने हनुमान जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ सोहळा !

हनुमानाचा जप, श्रीराम आणि हनुमान यांची आरती, मारुतिस्तोत्र, हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, हनुमंताची मानसपूजा असे सर्वत्रच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय केंद्रशासनाने तात्काळ घ्यावा, संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा विषय हा कोणत्या एका पक्षाचा नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र येऊन आपणाला हवे ते साहाय्य करू. मराठा समाज सहनशील आहे. ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे.