नागपूर येथे विविध मागण्यांसाठी ३५० प्रशिक्षणार्थी आधुनिक वैद्य बेमुदत संपावर !

आधुनिक वैद्यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल ! गेल्या १ वर्षापासून कोरोनाच्या संकटकाळात स्वार्थ सोडून अनेक आधुनिक वैद्य कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत; मात्र नागपूर येथे आधुनिक वैद्य स्वार्थासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी असे न करता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यावर भर देणे, हेच त्यांचे कर्तव्य आहे. नागपूर – मुंबई, पुणेच्या धर्तीवर मानधनात वाढ … Read more

राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्याविषयीचा अहवाल २ मासांत सादर करणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

राज्यात नवीन शैक्षणिक धोरण कसे राबवता येईल, याचा अभ्यास करून सूचना करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला ‘टास्क फोर्स’ येत्या २ मासांत अहवाल सादर करेल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

धगधगता बंगाल !

धगधगत्या बंगालची एकूण परिस्थिती पहाता नि भविष्यातील संभाव्य धोके यांकडे लक्ष ठेवून केंद्राने वेळेतच योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे, हेच खरे !

मुंबई महापालिका प्रत्येक वार्डच्या बाहेर लसीकरण केंद्रांची माहिती देणार ! – महापौर

४५ वर्षांपुढील व्यक्ती आणि पहिल्या फळीतील कोविड योद्धे थेट लसीकरण केंद्रात जाऊन लसीचा दुसरा डोस घेऊ शकतात. अशी ५९ केंद्रे असून त्याची प्रत्येक वार्डला माहिती दिली जाणार आहे.

स्थानांतर केल्यामुळेच परमबीर सिंह यांचे खोटेनाटे आरोप ! – अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ४ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले मुंबई पोलीस आयुक्तपदावरून स्थानांतर केल्यामुळेच त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर चुका क्षमा करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या..

बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात भाजपच्या वतीने निदर्शने

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू केला असून त्यात भाजप कार्यकर्त्यांचे खून करण्यात आले आहेत. या राजकीय हिंसाचाराचा भाजपच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसर्‍या लाटेसाठी सिद्ध रहायला हवे…..

गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाचा डाव !

अगोदर केवळ चित्रपट, नाटके यांच्या माध्यमांपुरते मर्यादित असणारे गुंड, गुन्हेगार आणि आर्थिक भ्रष्टाचार करणारे यांचे उदात्तीकरण ‘वेब सिरीज’च्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात होत आहे.

ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !

ममता बॅनर्जी यांनी ५ मे या दिवशी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनवल्या आहेत. या वेळी केवळ त्यांचाच शपथविधी पार पाडला. अन्य मंत्र्यांचा शपथविधी ६ किंवा ७ मे या दिवशी होण्याची शक्यता आहे.

ताकतोडा (जिल्हा हिंगोली) येथे पैसा नसल्याने गांजा लागवडीची अनुमती द्यावी !

जिल्ह्यात कोरोनाच्या संकटामुळे बाजारात शेतीमालास भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने पिकांची हानी झाली आहे. अधिकोष बंद असल्याने पीककर्ज मिळत नाही.