पुणे-बेंगळूरू महामार्गावर ऑक्सिजन टँकरला गळती !

टँकरमध्ये ऑक्सिजन किती भरावा, यावर कुणाचा अंकुश कसा नाही ? ऑक्सिजनची कमतरता असतांना मानवी चुकीमुळे ऑक्सिजन वाया घालवणार्‍यांना कठोर शिक्षाच हवी. प्रशासनाने सर्वत्रचे ऑक्सिजन टँकर आवश्यक तेवढेच भरले जातात ना, यावर लक्ष ठेवायला हवे !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे विक्रम भावे यांना सशर्त जामीन संमत !

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले ‘मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे लेखक तथा हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांना ६ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन संमत केला.

गुंडेवाडी (जिल्हा सातारा) येथे सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार ! – शरद निकम, सरपंच

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रहित करून मराठा समाजावर अन्याय केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकत असून कोणत्याही नेत्यास गावात प्रवेश दिला जाणार नाही.

कोरोना साथीच्या काळात केलेल्या खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करा ! – माजी आमदार विलास लांडे

जनतेचा पैसा अनाठायी व्यय करणे गंभीर आहे. शासनाने हे प्रकरण त्वरित तडीस न्यावे, ही अपेक्षा !

बनावट धनादेश वटवणार्‍या टोळीचा सूत्रधार देहली येथून कह्यात !

कायद्याचे भय नसलेले गुन्हेगार ! गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे ते सराईत होतात !

८ वर्षांच्या मुलाला विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या पित्याला जन्मठेप

कौटुंबिक कलहातून ८ वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या वडिलांना जिल्हा मुख्य न्यायाधीश आर्.डी. सावंत यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेचा मिशन वायू उपक्रम !

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेने मिशन वायू हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांकडे ‘ऑक्सिजन प्लान्ट’ आणि ‘व्हेंटिलेटर’ देण्यात येणार आहेत.

श्री तुळजाभवानी मंदिरातील दुरुस्ती कामे पूर्ण करावीत !

कोरोनाच्या संसर्गामुळे श्री तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे मंदिरातील आवश्यक असलेली दुरुस्ती कामे चालू करण्यात यावीत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष यांना देण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार ! – भाजप नेत्याची चेतावणी

बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे; पण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती आणि संस्था यांच्या हाती एकवटली आहे. यामध्ये तात्काळ सुधारणा केली जावी, अन्यथा आंदोलन करण्याची चेतावणी भाजप नेते दिलीप खैरे यांनी दिली आहे.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका विशाखा अशोक दाभाडे यांचे पती अशोक शांताराम दाभाडे (वय ८० वर्षे) यांचे अल्पश: आजाराने ६ मे या दिवशी पहाटे ३ वाजता निधन झाले.