क्षमतेहून अधिक ऑक्सिजन भरल्यामुळे गळती
टँकरमध्ये ऑक्सिजन किती भरावा, यावर कुणाचा अंकुश कसा नाही ? ऑक्सिजनची कमतरता असतांना मानवी चुकीमुळे ऑक्सिजन वाया घालवणार्यांना कठोर शिक्षाच हवी. प्रशासनाने सर्वत्रचे ऑक्सिजन टँकर आवश्यक तेवढेच भरले जातात ना, यावर लक्ष ठेवायला हवे !
सातारा – येथील पुणे-बेंगळूरू महामार्गावरील वाढे फाट्याजवळ सायंकाळी ६.१५ वाजता ऑक्सिजन टँकरला गळती लागली. त्यामुळे सहस्रो लिटर ऑक्सिजनचा व्यय झाला. पेण येथून कोल्हापूर येथे हा ऑक्सिजन टँकर निघाला होता. क्षमतेहून अधिक ऑक्सिजन भरल्यामुळे त्याला महामार्गावरील वाढे फाटा येथे गळती लागली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या तंत्रविभागाने आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तंत्रविभागांच्या कर्मचार्यांनी ही गळती आटोक्यात आणली. टँकरमधील ऑक्सिजन न्यून करून समपातळीला आल्यानंतर हा टँकर पुढे पाठवण्यात आला.