गुंडेवाडी (जिल्हा सातारा) येथे सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार ! – शरद निकम, सरपंच

सातारा – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रहित करून मराठा समाजावर अन्याय केला आहे. त्यामुळे सर्व गुंडेवाडी ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ खटाव तालुक्यातील गुंडेवाडी ग्रामस्थ यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकत असून कोणत्याही नेत्यास गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशी चेतावणी गुंडेवाडी गावचे सरपंच शरद निकम यांनी दिली आहे.

सरपंच निकम पुढे म्हणाले की, आतापर्यंत सर्वच नेत्यांनी मराठा समाजाला केवळ झुलवत ठेवले. समाजाने आतापर्यंत शांततेत मोर्चे काढले, आंदोलने केली. यामध्ये अनेक मराठा बांधव हुतात्मा झाले. तरीही न्यायव्यवस्थेने समाजाचा विचार केला नाही, याचे आश्‍चर्य वाटते. या निर्णयामुळे मराठा समाजाचा भविष्यकाळ अंध:कारमय झाला आहे. मराठा आरक्षणासाठी सर्वांनी राजकीय गट-तट बाजूला ठेऊन संघटित झाले पाहिजे.