श्री तुळजाभवानी मंदिरातील दुरुस्ती कामे पूर्ण करावीत !

पुजारी मंडळाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

श्री तुळजाभवानी मंदिर

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – कोरोनाच्या संसर्गामुळे श्री तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे मंदिरातील आवश्यक असलेली दुरुस्ती कामे, नियोजित असलेले दर्शन मंडप आणि मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्ग यांची कामे चालू करण्यात यावीत, या मागणीचे निवेदन पुजारी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष यांना देण्यात आले. निवेदनावर पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांची स्वाक्षरी आहे. मंदिर प्रशासनाने योग्य ती माहिती घेऊन मंदिरच्या सोयीसुविधांसाठी सकारात्मक विचार करावा, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.