मराठा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेचा मिशन वायू उपक्रम !

नगर – मराठा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेने मिशन वायू हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांकडे ‘ऑक्सिजन प्लान्ट’ आणि ‘व्हेंटिलेटर’ देण्यात येणार आहेत. नगर जिल्ह्यातील उद्योजकांकडून येणारे साहाय्यही आरोग्यसेवेसाठी वापरले जाणार असल्याची माहिती मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात एम्.सी.सी.आय.ने (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर) महाराष्ट्रातील आरोग्य सेवा क्षेत्रातील मागणी आणि पुरवठ्यातील पोकळी भरून काढण्यासाठी व्यासपीठ उभारण्याची कल्पना केली. यातूनच गेल्या वर्षभरात ३०० हून अधिक ‘व्हेंटिलेटर’, १३० एच्.एफ्.एन.ओ., ६०० खाटा , कोविड केअर सेंटर आधी सुविधा उपलब्ध करून दिल्या.