व्याजासहित ७ सहस्र ३०० कोटी रुपये पंजाब नॅशनल बँकेला चुकते करावेत !

पंजाब नॅशनल बँकेची (पीएन्बीची) फसवणूक करून देशातून पळून गेलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना पुण्यातील कर्जवसुली प्राधिकरणाने (डीआर्टीने) ‘व्याजासहित ७ सहस्र ३०० कोटी रुपये बँकेला चुकते करावेत’, असा आदेश दिला आहे.

नीरव मोदी यांची २८३ कोटी रुपये जमा असलेली परदेशातील बँक खाती गोठवली

‘घोटाळेबहाद्दर नीरव मोदी यांची कितीही बँक खाती गोठवली, तरी त्यांना भारतात आणून त्यांनी लुटलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम जोपर्यंत वसूल केली जात नाही, तोपर्यंत भारत सरकारने स्वस्थ बसू नये’, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

मेहुल चोक्सी यांचे नागरिकत्व रहित करून त्यांना भारताच्या कह्यात देणार !

पंजाब नॅशनल बँकेतील १३ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी यांना लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. सध्या चोक्सी अँटिग्वा देशामध्ये वास्तव्याला आहेत.

मेहुल चोक्सी यांना भारतात आणण्याची प्रक्रिया चालू

पंजाब नॅशनल बँकेची १३ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना लंडन येथे अटक करण्यात आल्यावर याच प्रकरणातील पळून गेलेले दुसरे आरोपी मेहुल चोक्सी यांना भारतात आणण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.

नीरव मोदी यांना लंडनमध्ये अटक

पंजाब नॅशनल बँकेचे १३ सहस्र कोटी रुपये बुडवून भारतातून पळून गेलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे.

नीरव मोदी यांच्या विरोधात लंडनमधील न्यायालयाकडून अटक वॉरंट

पंजाब नॅशनल बँकेचे १३ सहस्र कोटी रुपये बुडवून लंडनमध्ये पळून गेलेले हिरे व्यावसायिक नीरव मोदी यांच्या विरोधात लंडनमधील वेस्टमिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.

नीरव मोदीच्या पत्नीविरोधात अजामीनपात्र वॉरंट !

पीएन्बी घोटाळ्याप्रकरणी फरार आरोपी नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्याविरुद्ध विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएम्एल्ए) न्यायालयाचे न्यायाधीश एम्.एस्. आझमी यांनी १५ मार्च या दिवशी अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

नीरव मोदी यांचा अलिबाग येथील बंगला भुईसपाट

पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पसार झालेला  नीरव मोदी याचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील किहीम समुद्र किनार्‍याजवळील बंगला ८ मार्च या दिवशी नियंत्रित स्फोटाने भुईसपाट करण्यात आला.

मेहूल चोकसी यांनी भारतीय नागरिकत्व सोडले

पंजाब नॅशनल बँकेतील तब्बल १४ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार आरोपी, तसेच हिरे व्यापारी मेहूल चोकसी यांनी भारतीय नागरिकत्व सोडले. चोकसी यांनी एंटीगुआ येथील भारतीय उच्चायुक्तालयात २१ जानेवारी या दिवशी स्वतःचे पारपत्र जमा केले.

नीरव मोदी यांचा अनधिकृत बंगला तोडण्याचा आदेश

पंजाब नॅशनल बँक (पीएन्बी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांचा अनधिकृत बंगला भुईसपाट करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने १४ जानेवारी या दिवशी दिला.


Multi Language |Offline reading | PDF