सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांकडून उत्तर मागितले !

बंगालमधील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारामुळे लोकांच्या पलायनाचे प्रकरण

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात झालेल्या हिंसाचारामुळे सहस्रो लोकांनी पलायन केले. त्यांना पलायन करण्यापासून रोखण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडे उत्तर मागितले आहे. या याचिकेद्वारे पलायन रोखणे, पलायनाची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक स्थापन करणे आणि दोषींना कठोर शिक्षा करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग यांनाही पक्षकार बनवण्याचा आदेश दिला आहे.