‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वीकारार्ह नाही ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

(प्रतिकात्मक छायाचित्र)

चंडीगड – ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ हे नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वीकारार्ह नाही, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. तसेच न्यायालयाने या प्रकरणात ‘मुलीच्या कुटुंबियांपासून संरक्षण मिळावे’, अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.


१. उत्तरप्रदेशची १९ वर्षीय तरुणी आणि पंजाबचा २२ वर्षीय तरुण यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. गेल्या ४ वर्षांपासून हे दोघे लिव्ह-इन संबंधांमध्ये आहेत; मात्र तरुणीच्या कुटुंबियांचा आंतरजातीय विवाहाला विरोध आहे. त्यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्याचा या दोघांनी दावा केला आहे. त्यामुळे ‘तरुणीच्या कुटुंबियांकडून संरक्षण मिळावे’, अशी मागणी या दोघांनी केली होती.

२. याचिका फेटाळतांना न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्ते त्यांच्या संरक्षणासाठी याचिका करून त्यामाध्यमातून त्यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपला मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात संरक्षण पुरवले जाऊ शकत नाही.