नागपूर येथे आयकर आयुक्तांकडून महिला आधुनिक वैद्याचे शारीरिक शोषण !

अशा घटना म्हणजे उरलीसुरली नैतिकता संपत चालल्याचे लक्षण !

नागपूर – ‘यू.पी.एस्.सी.’ची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्याच्या नावाखाली आयकर आयुक्त सुथादिरा बालन (वय ३५ वर्षे) यांनी महिला आधुनिक वैद्याचे शारीरिक शोषण केले आहे. दोघांमधील संबंधांतून महिला आधुनिक वैद्या गर्भवती राहिली. त्यानंतर ‘बालन यांनी बळजोरीने गर्भपात करायला लावला’, असा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी बालन यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.