नवी देहली – ‘अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन’ या केंद्र सरकारच्या पॅनेलने कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना ३ मासांनंतर कोरोनाची लस देण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ या लसीच्या २ डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला याच पॅनलने दिला होता. गरोदर आणि स्तनपान करणार्या महिलांनाही कोरोनाची लस देण्यात यावी, असा सल्लाही या पॅनलने दिला आहे. आरोग्य मंत्रालय यासंदर्भातील निर्णय पुढील काही दिवसांमध्ये घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोनामुक्त झाल्यानंतर लसीचा पहिला डोस घेण्यासाठी ३ मासांचे अंतर सुरक्षित आहे.
कोरोनामुक्तीनंतर 3 महिन्यांनी लस, स्तनपान करणाऱ्या महिलाही लस घेऊ शकतात, नव्या गाईडलाईन्स जारी https://t.co/APFoD4VBN4 @PMOIndia @narendramodi @drharshvardhan @CMOMaharashtra @rajeshtope11 #CoronaVaccine #CoronaVaccination #NEGVAC #NewGuidelines #UnionHealthMinistry
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2021
पॅनलने दिलेल्या सल्ल्यानुसार संसर्ग झाल्यानंतर आणि पहिला डोस घेण्यामध्ये अधिक अंतर असेल, तर शरिरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी लाभ होईल.