पुणे जिल्ह्यात विनाकारण फिरणार्‍यांचे वाहन जप्त करण्याचे पोलिसांना अधिकार

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दळणवळण बंदी संपेपर्यंत वाहने परत देऊ नयेत, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

निवृत्त भूमी अभिलेख अधिकार्‍याकडे ८८ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता

बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

राज्यात लाचलुचपत विभागाच्या कारवाईत वर्षभरात ३७६ आरोपींना अटक

पुणे विभागात लाचखोरीच्या तक्रारी अल्प आल्या कि कारवाई करण्यात विभाग अल्प पडत आहे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

सोलापूर महापालिका क्षेत्रात प्रवेश करणार्‍यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी अहवाल बंधनकारक

मालवाहतूक करणार्‍या वाहनांविषयी एकाच वेळी वाहनांमध्ये दोन व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवास करता येणार नाही.

लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोलापूर महापालिकेत बालरोगतज्ञांची बैठक

नागरिकांनी आपल्या मुलांना कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित महापालिकेच्या ‘फिव्हर ओपीडी’ येथे घेऊन यावे.

उत्तरप्रदेशच्या गावांतील आरोग्यव्यवस्था ‘राम भरोसे’ ! – अलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये राज्यातील गावांमध्ये आरोग्यव्यवस्था ‘राम भरोसे’ चालली आहे. वेळ असतांना यात पालट न करणे, याचा अर्थ आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला आमंत्रित करण्यासारखे आहे, अशा शब्दांत एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला कोरोनावरून फटकारले आहे.

अटकेनंतर बंगालचे २ मंत्री आणि १ आमदार प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात !

राजकारण्यांना अटक केल्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती बिघडते, हे नेहमीचेच झाले असून या आजारावरही आता प्रभावी ‘लस’ काढण्याची आवश्यकता आहे, अशी कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

चोरीच्या प्रकरणी हिंदु तरुणांवर अत्याचार करणार्‍या धर्मांधांना अटक

बॅटरी चोरीच्या प्रकरणी तिघा हिंदु तरुणांना मारहाण करून संपूर्ण गावामध्ये त्यांची धिंड काढण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महंमद शेरू आलम, महंमद जिन्नत, महंमद तेजू, महंमद नासिर, महंमद अख्तर आणि अमरजीत सिंह यांना अटक केली आहे.

भिवंडी येथे १२ सहस्र जिलेटिनच्या कांड्या आणि ३ सहस्र ८ डिटोनेटर यांचा अवैध साठा जप्त !

इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडणे हे राज्यासाठी चिंताजनक ! यामागील सूत्रधाराचा तातडीने शोध घेऊन यामागील षड्यंत्र उद्ध्वस्त करायला हवे !

बेळगाव येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पू. डॉ. वा.पु. गिंडे महाराज यांचा देहत्याग !

संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पू. डॉ. वा.पु. गिंडे महाराज (वय ८५ वर्षे) यांनी १७ मे या दिवशी बाजार गल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.