अटकेनंतर बंगालचे २ मंत्री आणि १ आमदार प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात !

नारदा घोटाळा !

राजकारण्यांना अटक केल्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती बिघडते, हे नेहमीचेच झाले असून या आजारावरही आता प्रभावी ‘लस’ काढण्याची आवश्यकता आहे, अशी कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

कोलकाता (बंगाल) – नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारचे २ मंत्री फिरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी, तसेच आमदार मदन मित्रा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

या तिघांना अटक केल्यानंतर जामीन मिळाला होता; मात्र कोलकाता उच्च न्यायालयाने रात्री तो रहित केल्याने त्यांना कारागृहात नेण्यात आल्यावर त्यांची प्रकृती बिघडली. या तिघांसह तृणमूलचे नेते सोवन चटर्जी यांनाही अटक करण्यात आलेली आहे. चटर्जी पूर्वी भाजपमध्ये होते.