भिवंडी येथे १२ सहस्र जिलेटिनच्या कांड्या आणि ३ सहस्र ८ डिटोनेटर यांचा अवैध साठा जप्त !

अटक केलेल्या आरोपीला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी

  • इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडणे हे राज्यासाठी चिंताजनक ! यामागील सूत्रधाराचा तातडीने शोध घेऊन यामागील षड्यंत्र उद्ध्वस्त करायला हवे !
  • राज्यात अवैध स्फोटकांचा साठा सापडणे, हे समाजातील गुन्हेगारांना कायदा आणि सुव्यवस्थेचे भय न राहिल्याचे लक्षण म्हटल्यास चुकीचे ते काय ?

ठाणे, १८ मे (वार्ता.) – भिवंडी येथील कारीवली गावाच्या हद्दीतील खदानीच्या शेजारी असलेल्या एका कार्यालयात पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १२ सहस्र जिलेटिनच्या कांड्या आणि ३ सहस्र ८ इलेक्ट्रिक डिटोनेटर असे एकूण २ लाख ७ सहस्र रुपये किमतीचे स्फोटक पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुरुनाथ म्हात्रे (वय ५३ वर्षे) यांच्यावर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक केली आहे. त्यांना भिवंडी न्यायालयात उपस्थित केले असता २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.