देशात १ लाख ७० सहस्र रुग्णांना व्हेंटिलेटर्सची, तर ९ लाख रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता ! – केंद्रीय आरोग्य मंत्रालय
सध्या देशात १ लाख ७० सहस्र ८४१ कोरोनाबाधितांना व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे, तर ९ लाख २ सहस्र २९१ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. कोरोनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.