ठाणे येथे पुढार्‍यांच्या हस्तकांकडून टोकन न घेताच केंद्रातील लसींचा साठा घेतला जातो ! – आमदार संजय केळकर, भाजप

आमदार संजय केळकर

ठाणे, ९ मे (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या बहुतांश आरोग्य केंद्रांवर मोठमोठ्या पुढार्‍यांच्या हस्तकांच्या माध्यमातून टोकन न घेताच केंद्रातील लसींचा साठा घेतला जात आहे, असा धक्कादायक आरोप ठाणे येथील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. अशांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

एखाद्या केंद्रात १०० लसींचा साठा आला, तर पुढार्‍यांचे हस्तक त्यातील ५० लसी स्वतःसाठी राखून ठेवण्यास केंद्र संचालकांना सांगतात. त्यामुळे टोकन घेऊन रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना याचा नाहक मन्स्ताप सोसावा लागतो.