चीनच्या अनियंत्रित रॉकेटचे अवशेष हिंद महासागरात कोसळले !

नवी देहली – चीनचे अनियंत्रित झालेले रॉकेटचे अवशेष अखेर ९ मे या दिवशी सकाळी हिंद महासागरात कोसळले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्या रॉकेटचे बरेचसे भाग नष्ट झाले. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने हे अवशेष पेनिन्सुलामध्ये सापडल्याचे सांगण्यात आले होते.