हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन !
जळगाव, ९ मे (वार्ता.) – आज प्रत्येक महिलेने धर्माचरण केले, तरच पुढे येणार्या संकटांचा सामना ती करू शकते. आजच्या स्थितीला हिंदु महिला कुठेच सुरक्षित नाहीत. आधी फक्त रात्र वैर्याची होती, आता दिवसही वैर्याचा आहे. त्यासाठी प्रत्येक कठीण प्रसंगात प्रत्युत्तर देण्यासाठी आपण स्वरक्षण प्रशिक्षण शिकायला हवे. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या कपाळाला कुंकू लावून आपल्यातील दैवी शक्ती जागृत केली पाहिजे. स्वतःमध्ये देवीचा जागर करण्यासाठी धर्माचरण करणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. शबरी देशमुख यांनी केले. त्या जळगाव येथे युवतींसाठी आयोजित ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानामध्ये बोलत होत्या.
या वेळी शौर्य जागृत करणारी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. प्रात्यक्षिके पाहून उपस्थित प्रत्येकामध्ये शौर्य निर्माण झाले. व्याख्यानाचा उद्देश कु. पायल नेवे यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन कु. तेजल नेवे यांनी केले.
सहभागींच्या प्रतिक्रिया !
१. लव्ह जिहादविषयी सरकारने कठोर पावले उचलून तो थांबवला पाहिजे. – सौ. स्वप्ना राठोड, जामनेर
२. आजच्या व्याख्यानातील ही माहिती याआधी कधी ऐकली नव्हती. ती या व्याख्यानातून मिळाली आणि आम्ही जागृत झालो. – कु. सुप्रिया श्रावगी, यावल
३. हे व्याख्यान ऐकल्यानंतर ‘आपणही इतरांना प्रत्युत्तर देऊ शकतो’, असे वाटले. – श्रीमती लता मानकर, जामनेर
४. प्रत्येक स्त्रीने स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाचा जास्तीतजास्त प्रसार करणे आवश्यक आहे. – सौ. स्वाती जाधव, जळगाव