दळणवळण बंदीच्या काळात राज्य सरकारच्या धोरणावर टीका करणार्‍या महिलेवरील गुन्हा रहित !

गेल्या वर्षी दळणवळण बंदीच्या काळात राज्य सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या धोरणाविषयी  नवी मुंबईतील सुनैना होले या महिलेने टीका केली होती. या प्रकरणी महिलेवर मुंबईच्या सायबर विभागाने नोंद केलेला केलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने ५ मे या दिवशी रहित केला.

 कोरोना संसर्गाच्या काळात देशातील अधिकोषांमध्ये ६३ सहस्र अपव्यवहारांच्या तक्रारी !

१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२० या कोरोनाच्या संसर्गाच्या काळात देशातील विविध अधिकोषांमध्ये (बँक) ६३ सहस्र ३४५ अपव्यवहारांची नोंद करण्यात आली आहे. यात ९९ सहस्र ८६३ कोटी रुपये गुंतले होते, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून देण्यात आली.

चंद्रपूर येथे आधुनिक वैद्य आणि जिल्हा प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाबाधित तरुणाचा तडफडून मृत्यू !

६ मेपासून ‘कोविड ऑनलाईन मॅनेजमेंट पोर्टल’ या ‘पोर्टल’वर नोंदणी केलेले कोरोनाबाधित रुग्ण उमेश चिमूरकर (वय ४२ वर्षे) यांना ७ मे या दिवशी ६ घंटेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात खाट उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा रुग्णालयातच तडफडून मृत्यू झाला.

गृहविलगीकरणातील १०० हून अधिक कोरोनाबाधितांना प्रतिदिन २ वेळचे भोजन घरपोच करणारे शिवडी (मुंबई) येथील भालचंद्र जाधव !

श्री. भालचंद्र जाधव यांनी स्वतः कोरोनाची स्थिती अनुभवल्यानंतर गोरगरिबांसाठी स्वव्ययातून विनामूल्य भोजन चालू केले आहे. शासनावर अवलंबून न रहाता नियमित १०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांना ते २ वेळचे भोजन घरपोच देत आहेत.

डी.आर्.डी.ओ.चा बोलबाला !

देशात आपत्काळ आल्यावर केवळ स्वतःचे क्षेत्र किंवा काम यांपुरता मर्यादित विचार न करता व्यापक विचार करून कृती कशी करायची ? याचा पायंडा ‘डी.आर्.डी.ओ.’ने घालून दिला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी नागपूर येथील आधुनिक वैद्या अपूर्वा मंगलगिरी यांनी स्वतःचा विवाह मोडला !

कोरोनाच्या संकटात नियमांचे उल्लंघन करून अनेकांनी विवाह केले; मात्र आधुनिक वैद्या अपूर्वा यांनी कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी स्वतःचा विवाह मोडला, यावरून त्यांच्यातील समाजबांधिलकी दिसून येते. यातून इतरांनी बोध घ्यावा !

योगगुरु स्वामी आध्यात्मानंद यांचे कोरोनामुळे निधन पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण

स्वामीजींनी देश-विदेशांत ८१४ शिबिरे घेऊन लोकांना योग, प्राणायम आणि चिंतन यांचे धडे दिले. त्यांनी वर्ष १९९९ मध्ये न्यू मेक्सिको येथील चियापास येथे झालेल्या ‘विश्‍व शांती संमेलना’त भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

जालना येथील सर्व रुग्णालयांतील कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना विनामूल्य जेवणाचे डबे पोचवले जातात !

यातून इतरांनी बोध घेऊन असा उपक्रम चालू करावा !

देवच आधार आहे !

कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आपत्काळाची झळ बसत आहे. यापुढील काळ तर याहून भयावह असणार आहे. या काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त होणेच आवश्यक आहे.