लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्यांना विहीत वेळेत दुसरा डोस द्या ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली

ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिविरचा पुरवठा या दोन गोष्टींचे फार मोठे आव्हान आहे.

वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) भरण्यास करदात्यांना मुदतवाढ

गेल्या आर्थिक वर्षात ५ कोटींपर्यंत आर्थिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना मार्च आणि एप्रिल मासाचा ३-बी रिटर्न’ भरण्यास ३० दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याविरोधात अटक वॉरंट !

पडळ येथील साखर कारखान्यावर एका अधिकार्‍याला मारहाण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी अटक वॉरंट काढले आहे

राज्यातील बंदीवानांनी कारागृह भरली असल्याने अत्यावश्यक असणार्‍यांनाच अटक करा ! – अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांचा आदेश

४६ कारागृहांची बंदीवान ठेवण्याची क्षमता २३ सहस्र २१७ असून सद्याच्या स्थितीमध्ये तेथे ३४ सहस्र ८९६ बंदीवान आहेत.

घटनेत टिकणारे आरक्षण द्या अन्यथा राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटतील ! – मराठा क्रांती मोर्चाची चेतावनी

राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

फलटण (जिल्हा सातारा) येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे अटकेत !

तिघे मिळून रुग्णांच्या नातेवाइकांना ३ सहस्र रुपयांचे इंजेक्शन ३५ सहस्र रुपयांना विकत होते.

पुणे येथे ठराविक रकमेपेक्षा अधिक रक्कम घेतांना महिलेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या रुग्णवाहिका चालकाला अटक !

किशोर पाटील या रुग्णवाहिका चालकाने अवघ्या ९ कि.मी. अंतरासाठी ठरलेल्या दरापेक्षा अधिक दराने म्हणजे १४ सहस्र रुपये घेतले

सातारा जिल्ह्यात १५ मेपर्यंत दळणवळण बंदी !

सातारा जिल्ह्यात दळणवळण बंदी जाहीर केल्यापासून रुग्णसंख्या वाढतच आहे. बांधितांच्या आणि नातेवाइकांच्या रुग्णालयाबाहेर रांगाचरांगा लागत आहेत.

भाजपच्या वतीने कोल्हापूर येथे रुग्णांच्या नातेवाइकांना विनामूल्य पोळी-भाजी वितरण उपक्रमास प्रारंभ

भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे विनामूल्य पोळी-भाजी वितरण उपक्रमास प्रारंभ .