सनातनच्या साधिका कु. वर्षा जबडे यांना मातृशोक


अकलूज (सोलापूर) – येथील कु. वर्षा जबडे यांच्या मातोश्री सौ. वैजयंती रमणलाल जबडे (वय ६४ वर्षे) यांचे ९ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, १ मुलगा, १ सून, २ विवाहित मुली, जावई आणि नातवंडे, १ अविवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांची मुलगी कु. वर्षा जबडे या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात १० वर्षांपासून पूर्णवेळ सेवा करत आहेत. त्यांनी तिला साधनेसाठी नेहमी प्रोत्साहन दिले. त्या प्रतिदिन नामजप करत असत. सनातन परिवार जबडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.