कोल्हापूर, ९ मे – ग्रामीण भागातील अनेक रुग्णांवर शहरातील मोठ्या रुग्णालयांत उपचार चालू आहेत. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांची जेवण मिळण्यासाठी कसरत होत आहे. अशा अनेक लोकांची आवश्यकता लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विनामूल्य पोळी-भाजी वितरण उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, ग्रामीण सरचिटणीस विठ्ठल पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राउत यांसह अन्य उपस्थित होते.