राज्यातील बंदीवानांनी कारागृह भरली असल्याने अत्यावश्यक असणार्‍यांनाच अटक करा ! – अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांचा आदेश

 

अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद

संभाजीनगर – ‘राज्यातील कारागृहांत बंदीवान ठेवण्याची क्षमता संपली आहे. कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन यापुढे अत्यावश्यक असेल, तरच आरोपींना अटक करावे’, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावले आहेत. ४६ कारागृहांची बंदीवान ठेवण्याची क्षमता २३ सहस्र २१७ असून सद्याच्या स्थितीमध्ये तेथे ३४ सहस्र ८९६ बंदीवान आहेत. क्षमतेपेक्षा ११ सहस्र ६७९ बंदीवान अधिक आहेत. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत कारागृहांत कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, असे लक्षात आल्याने वरील आदेश देण्यात आला आहे.