केंद्र सरकार १०० टक्के कोरोना लसींची खरेदी का करत नाही ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न

वास्तविक न्यायालयावर हा प्रश्न विचारण्याची वेळ येऊ नये. केंद्र सरकारनेच जनतेला याविषयी माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक !

मागील १४ मासांत तुम्ही काय केले ?

मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील राजकीय सभांवर चाप लावण्यात अपयशी ठरल्यावरून निवडणूक आयोगाला उत्तरदायी ठरवले होते.

चीन सैन्याकडून तिबेटमध्ये नवीन कमांडरची गुपचूप नियुक्ती

चीन विश्वासघातकी असल्याने त्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून भारताने सतर्क रहाणेच योग्य आहे ! चीनने कुरापत केली, तर त्याला जशास तसे उत्तर देण्याची सिद्धता भारताने केली पाहिजे !

निवृत्तीची वयोमर्यादा न वाढवल्यास मुंबईतील १ सहस्र २०० डॉक्टरांची संपाची चेतावणी

कोरोनाचे सद्यःस्थितीतील गंभीर संकट पहाता डॉक्टरांनी संपावर जाणे, म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार होय ! आपत्काळात स्वतःच्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसणे कितपत योग्य ?

कर्नाटकच्या मंत्र्याकडून धान्य पुरवठ्याच्या विलंबाविषयी प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यास ‘जाऊन मरा’ असे उद्दाम उत्तर !

असे उद्दाम उत्तर देणे, ही असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. कर्नाटकमधील सत्ताधारी भाजप सरकारने अशांवर कारवाई करणे अपेक्षित आहे !

तिसऱ्या लाटेच्या वेळी प्राणवायू नसल्याचे कारण सांगता येणार नाही !

२९ एप्रिल या दिवशी उद्धव ठाकरे यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह कोरोना नियंत्रण कृतीगटातील तज्ञही सहभागी झाले होते.

महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल ! – डॉ. शशांक जोशी, सदस्य, कोरोना टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्रामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीमध्ये, म्हणजेच सप्टेंबर २०२१ मध्ये (भाद्रपद मासात) कोरोनाची तिसरी लाट येईल, असे मत महाराष्ट्र राज्याच्या ‘कोरोना टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.